क्रीडा

शरद पवारांशी पंगा घेणे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देखील पडलं महागात; व्हिडिओ नक्की पाहा

महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप यांची महायुती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लावले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन टोकाच्या विचारसरणी असलेल्या पक्षांना आघाडीत एकत्र आणलं. त्यामुळे शरद पवारांशी पंगा घेणे किती महागात पडते याचा अंदाज भाजपाला आला असेल हीच चर्चा आता सगळीकडे ऐकायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी तर शरद पवार यांच्या काळ संपला असंही म्हटलं होतं. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी भाजप प्रवेश केला होता. यात साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांचाही समावेश होता. त्यांच्याविरुद्ध साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारावेळी पावसात शरद पवार यांनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील वातावरणच बदलून टाकलं.

मात्र शरद पवार यांनी राजकीय अनुभवाच्या जोरावर आपणही पैलवान नाही तर वस्ताद असल्याचं सिद्ध करून दाखवलं. फक्त राजकीय विरोधकानांच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला देखील शरद पवारांशी पंगा घेणे महागात पडले आहे.

आयसीसीचे अध्यक्ष असताना 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शरद पवारांसोबत बेशिस्त वर्तन केलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती. तेव्हाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *