क्रीडा

गरीबांसाठी दादाची 50 लाखांची मदत 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 21 दिवस सगळ्यांना घरी बसून कोरोना व्हायरसशी लढायचे आहे. पण जे गरीब गरजू लोक आहेत ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना मदत करण्याचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला आहे.

सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवेदनात जाहीर करण्यात आल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवलेल्या गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या साथीने ५० लाखांच्या तांदळाची मदत गांगुलीकडून करण्यात येणार आहे. आशा आहे की, गांगुलीच्या पुढाकाराने राज्यातील इतर नागरिकांनाही आपल्या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी अशीच पावले उचलण्याची प्रेरणा मिळेल.