क्रीडा

कोरोनामुळे 21 वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे एका 21 वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत तो २०१६ पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. त्याच्या शरिरात कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात येत होते. परंतु करोनाशी त्याची झुंज अपयशी ठरली.

अटलेटीको पोर्टादा अल्टाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरन याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आली. ग्रासियाच्या जाण्याने फुटबॉल जगतासोबतच अनेकांना धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *