क्रीडा

अजिंक्य रहाणे झाला बाबा; गोंडस नन्ही परीचे झाले आगमन

टीम इंडियाचा कसोटी संघाचा उपकर्णधार अंजिक्य रहाणेच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. अंजिक्यची पत्नी राधिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  ही गोड आनंदाची बातमी भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने ट्विटरवरून दिली आहे.

सध्या अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. अजिंक्य आणि राधिका हे शाळेपासून मित्र होते, या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमामध्ये झालं. २६ सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला होता.