क्रीडा

विराट कोहली पितो फ्रान्सचे पाणी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. विराटने आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर भारतीय संघाचा दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम ठेवला आहे. असा एकही रेकॉर्ड नाही ज्याची नोंद विराट कोहलीच्या नावावर नाही. क्रिकेटसोबत विराट आपल्या फिटनेसकडे पण खूप लक्ष देतो.

विराटच्या फिटनेसमध्ये एक महत्त्वाचा पैलु म्हणजे पाणी. विराट खुप पाणी पितो, एवढेच नाही तर नुकतेच विराटनं पाणी विकण्याचाही निर्यय घेतला होता. तुमचा विश्वास बसणा नाही विराट जे पाणी पितो त्याची किंमत आहे 35 हजार रुपये. विराट फ्रान्सच्या Evianचे पाणी पितो. फक्त विराटसाठी हे पाणी फ्रान्स मधून आयात केले जाते.