क्रीडा

धोनीची लाडली झिवा म्हणते, रणवीरने माझा गॉगल का घातला ?

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याची लाडकी लेक झिवाचा एक मजेशीर किस्सा इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा किस्सा ऐकूण तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

धोनीने आपली मुलगी झिवा हिचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये झिवा आणि रणवीर सिंग या दोघांनी काहीसा सारखाच गॉगल लावला आहे. ‘जेव्हा झिवाने रणवीरला गॉगल घातलेला पाहिले तेव्हा तिने विचारले की माझा गॉगल त्याने का घातला? त्यानंतर ती वरच्या खोलीत गेली. स्वत:चा गॉगल घेऊन आली आणि म्हणाली की माझा गॉगल तर माझ्याकडेच आहे. धोनी हे देखील म्हणतो की, झिवा ज्यावेळी रणवीरला भेटेल तेव्हा ती आपल्या सारख्या गॉगल बद्दल त्याला सांगेल हे मात्र नक्की.

यावरुन आपल्याला कळालेच असेल की, लहानमुलांची कल्पनाशक्ति किती अफाट आहे.