क्रीडा

रविंद्र जाडेजाने घातली विक्रमाला गवसणी 47 सामन्यात 200 विकेट्स

खुंखार गोलंदाज असलेल्या रविंद्र जाडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विक्रमाला गवसणी घातली. रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेटचा टप्पा गाठणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे.

रवींद्र जडेजाने ४४ टेस्ट मॅचमध्येच २०० विकेट घेतल्या आहेत. त्यासोबतच श्रीलंकेच्या रंगना हेराथने ४७ टेस्टमध्ये 200 विकेट्स घेतल्या आहेत. मिचेल जॉनसने ४९ टेस्टमध्ये, मिचेल स्टार्कने ५० टेस्टमध्ये तर बिशनसिंग बेदी आणि वसीम अक्रम यांनी ५१ टेस्टमध्ये २०० विकेट घेतल्या होत्या.

रवींद्र जडेजाने सुरेख गोलंदाजी करीत डीन एल्गारला १६० रनवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं आणि त्याच्या २०० विकेट पूर्ण झाल्या. डिन एल्गारबरोबरच क्विंटन डिकॉकनेही त्याचं शतक पूर्ण केलं. डिकॉक १११ रनवर आऊट झाला. तर कर्णधार फॅफ डुप्लेसिसनेही अर्धशतकी खेळी केली.

जडेजाची कामगिरी
– रवींद्र जडेजाने ४४ टेस्टच्या ८३ इनिंगमध्ये २.४२ ची इकोनॉमी व २४.२२ च्या सरासरीने २०० विकेट घेतल्या.
– जडेजाने ९ वेळा इनिंगमध्ये ५ विकेट आणि १ वेळा १० विकेट घेतल्या.
– बॅटिंग करताना जडेजाने ३३.१२च्या सरासरीने १,५९० रन केले. यात १ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.