क्रीडा

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा ‘हिरो’ कसोटी सामन्यांत झाला ‘झिरो’

टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. मात्र दक्षिण आफ्रिका विरोधात होत असलेल्या सराव सामन्यात रोहितला आपलं खातंही उघडता आले नाही. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताच्या सलामीचा प्रश्न उभा राहिला आहे.

दुसरीकडे रोहितनं केवळ 27 कसोटी सामने खेळले आहेत. यात १ हजार ५८५ धावा केल्या आहेत. १७७ ही कसोटी क्रिकेटमधली रोहितची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. रोहितचे एकदिवसीय आणि टी-20 मधले रेकॉर्ड पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही. तसेच रोहित वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता.