क्रीडा

अन् चहलने उगारला ‘या’ तरुणीवर हात; व्हिडिओ झाला व्हायरल

कोरोनामुळे सध्या क्रिकेटचे काही सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भारताचे क्रिकटपटू सध्या घरी आहेत. हे क्रिकेटपटू घरी बसून सध्या आपल्या आवडीची कामे करत आहे. मात्र भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या टिक-टॉकवर सक्रिय असल्याचे दिसत आहे. सध्या युजवेंद्रचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

@yuzvendrachahalWhen you have an annoying but a cute friend##stargazing @rameetsandhuu 🤗 @tiktok_india @tiktok

♬ original sound – Yuzvendra Chahal

चहल सध्या ब्रिटिश मॉडेल आणि गायक रमीत संधूसोबत व्हिडीओ तयार करत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चहल आणि रमित संधू रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर चहल आपल्या शूजचे लेस बांधण्यासाठी खाली बसतो तेव्हाच रमित त्याच्यामागे लपते. जेव्हा चहलला रामित दिसत नाही तेव्हा तो घाबरून जातो. तितक्यातच रमित चहलच्या मागून येऊन त्याला घाबरवते. यावर चहल रमितवर प्रेमाने मारण्यासाठी हात उगारतो. टीकटॉवरचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.