क्रीडा

तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो; युवराज सिंगवर अन्याय झाला?

काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आजतकशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. युवराजने आपल्याला अजून एक विश्वचषक खेळायचा होता असे म्हणाला.

युवराजने आपली खंत व्यक्त करताना म्हणाला की, ‘मला वाईट वाटते की २०११ नंतर मी आणखी एक विश्वचषक खेळू शकलो नाही. त्यानंतर मला संघ व्यवस्थापनाकडून आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. जर त्यावेळी मला पाठिंबा मिळाला असता तर कदाचित मी अजून एक विश्वचषक खेळू शकलो असतो.’

त्याचबरोबर युवराजने योयो टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. ‘मला वाटले नव्हते 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मी खेळलेल्या 8-9 सामन्यांपैकी मला दोनदा सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतरही संघातून वगळले जाईल. मी दुखापतग्रस्त झालो होतो आणि मला श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करायला सांगण्यात आले होते.’