इतिहास

शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेला बाराशे टन खजिना गेला कुठं?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील धाडसी लढाया आणि थरारक घटना आपण लहानपणापासूनच ऐकतो. शाहिस्तेखान ची बोटं कापलेली घटना, अफजलखानाचा वध. तसेच आग्र्याहून स्वतःची केलेली सुटका असो किंवा मग सूरतेची लूट! अशा अनेक चित्तथरारक घटना इतिहासात नमूद आहेत. महाराजांनी ‘सुरत’ लुटली हे आपल्याला इतिहासातील अनेक संदर्भाद्वारे माहिती होते. महाराजांनी दुसऱ्यांदा जेंव्हा सुरत लुटली त्या लुटीतल्या निम्म्याहून अधिक भाग म्हणजे साधारण बाराशे टन एवढा खजिना नेमका कुठं गायब झाला, याचा शोध अजूनही लागला नाही. खुप शोध घेऊनही इतिहासकार, संशोधक, अभ्यासकांनी हात टेकले पण उत्तरं मिळाली नाहीत.

शिवाजी महाराजांनी सूरत दोनदा लुटली. त्यापैकी पहिली लूट जानेवारी 1664 मध्ये आपल्या घोडदळासह यशस्वी केली होती. हा तो काळ होता जेंव्हा मुघलांची अर्थव्यवस्था हि सुरतेच्या व्यापारावर अवलंबून होती . सुरत मध्ये सोने, हिरे,माणकांचे व्यापारी राहत असे. त्यांच्यामुळे सुरत श्रीमंत असायची असे मानले जायचे. तत्कालीन सोहनराय नावाचा जगातला श्रीमंत व्यापारी सुरतेमधलाच म्हणून मुघलांची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची असेल तर सुरत लुटलीच पाहिजे असा विचार करून त्यांनी सुरत लुटायची योजना दुसऱ्यांदा आखली. आणि हल्ला करून तेथील संपत्तीची लुटून सुरेतचं आर्थिक महत्व कमी करून टाकलं.

शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी संपत्तीची आवश्यकता होती त्यामुळे दुसरी लूट महत्वाची होती. .महाराजांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने दुसर्‍यांदा सुरत लुटली आणि वापस जातांना त्यांना शत्रूंचा सामना करायला लागला म्हणून त्यांनी शिताफीने खजिन्याचे दोन भाग केले आणि त्यातला एक भाग सुखरुप गडावर पोहोचला. आणि दुसरा भाग पोहचवण्याची कामगिरी गोंदाजी नावाच्या सरदारावर दिली. पण गोंदाजीलाहि मुघलांचा सामना करायला लागणार होता हे तो जाणून होता, म्हणून त्याने ज्या सात हजार जनावरांच्या पाठीवर तो खजिना वाहवून नेत होता त्या सर्व जनावरांना त्याने एका पठारावर सोडून दिलं आणि तो खजिना कुठंतरी लपवून ठेवला.

मुघलांच्या हल्ल्यात जखमी झालेला गोंदाजी कैदमध्येच मृत्यू पावला. खजिना कुठे लपवला याच गुपितंही सोबतच घेऊन गेला असं म्हणावं लागेल कारण त्यानंतर मुघलानी त्याचा शोध घेतला पण त्यांना त्याचा तपास लागला नाही. शिवाजी महाराजांनी आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी देखील हयातभर त्या खजिन्याचा शोध घेतला पण त्यांना देखील तो मिळाला नाही. इंग्रजांनी देखील शोधमोहीम हाती घेतली परंतु त्यांच्याही हाती तो लागला नाही.

ह्याच खजिन्याच्या शोधावर आधारित असणारी मुरलीधर खैरनारांची ‘शोध’ नावाची कादंबरीमध्ये खजिना हा नाशिकमध्ये एका रांगेत असलेल्या आठ किल्ल्यांपैकी कुठल्यातरी भागांत हा खजिना लपवला आहे असा एवढाच एक उल्लेख सापडतो. तसेच यात अशीही माहिती दिली कि, भारतातील काही बड्या कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्या खजिन्याचा शोध घेतायेत याची देखील माहिती दिली आहे.

‘सुरत लुटणे’ इतकेच उद्दिष्टय महाराजांचे कधीच नव्हते तर तेथील श्रीमंतांची संपत्ती लुटून आणली तर तेथील त्यांची आर्थिक स्थिती कोलमडेल आणि त्याचा फायदा स्वराज्याला होईल. तसेच सूरत लुटली तर मुघलांना जरब बसेल, असा विचार शिवाजी महाराजांनी केला होता, असं ‘Shivaji, His Life and Times’ या ग्रंथात इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी नमूद केलं आहे. जेंव्हा त्यांनी पहिल्यांदा म्हणजेच १६६४ मध्ये केली तेंव्हा त्यांचा सूड उगवण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना महाराजांकडे पाठवले होते.

त्यानंतर महाराज आग्र्याला गेले आणि त्यांना तिथे कैद झाली. पण तिथून सुटून ते राजगडावर पोहचले. आणि पुन्हा १६७० मध्ये दुसरी लूट करायची ठरली पण या दरम्यान मराठे आणि मुघल यांच्यात पुरंदरचासह अनेक किल्ल्यांचा तह झाला. पुन्हा नव्या जोमाने महाराजांनी औरंगजेबाला दणका देत सलग तीन दिवस सुरत लुटली आणि मिळवलेली संपत्ती स्वराज्यउभारणीसाठी वापरली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *