बातमी महाराष्ट्र

कोकण किनार पट्टीवरील मच्छिमारांचं अजब धाडस ,वादळाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत 210 बोटी समुद्रात

अरबी समुद्रात कमी हवेचा पट्टा तयार झाला आहे.या वादळाचे चक्री वादळात रूपांतर झाले असून, हे चक्री वादळ गुजरातच्या दिशेन सरकत आहे.त्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्याने किनार पट्टीवर धोक्याचा ईशारा दिला होता.

14 ते 16 मे दरम्यान खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका .असा मज्जाव मासेमारांना करण्यात आला आहे.तरी देखील शासनाचे नियम धुडकावत लावत 210 बोटी समुद्रात गेल्या आहेत.या सर्व बोटीना तात्काळ किनाऱ्यावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा सर्व प्रकार रायगड जिल्हयातील आहे.13 मे पूर्वी 154 नौका समुद्रात गेल्या होत्या. 14 मे रोजी आणखी 171 बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील बोटीचा समावेश आहे.एकूण 325 बोटी समुद्रात गेल्या होत्या त्यातील 229 बोटी परतल्या आहेत.आणखी 96 बोटी समुद्रात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *