इतर काम-धंदा पश्चिम महाराष्ट्र यशोगाथा शेती

भावाने १२०० रुपयात भाजीपाला निर्यातीचा सुरु केलेला व्यवसाय आज २४० कोटींपर्यंत पोहचला…

मध्यमवर्गीय कुटुंबात राहात असताना मुबंई सारख्या मेट्रोपोलिटन सिटी मध्ये आपला स्वतःचा बिझनेस उभा करण्याच स्वप्न बरेच जण पाहात असतात. पण ते सत्यात उभारण्यात फार कमी लोक यशस्वी होताना दिसतात. बिझनेस साठी फक्त बरच भांडवल लागत हा समज पूर्णतः चूकीचा ठरवला तो कोल्हापूरच्या सुशांत विजय फडणीसांनी….

मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सुशांत फडणीस यांच्या घरी बिझनेस करण्याच अनुभव वडलांना होता पण या सगळ्याचा तोटा माहित असल्याने सुशांत ने या मध्ये पडू नये असा त्यांचा विचार होता. घरचांच्या मते सुशांतनी कॉमर्स घेऊन बँकेत नोकरी करावी.

तरीही बिझनेस हेच आपलं ध्येय ठेऊन सुशांत यांनी कमी वयापासूनच छोटे मोठे बिझनेस करत होते. कधी मित्राबरोबर फटाके विकण्याचा व्यवसाय केला.

स्वीट कॉर्न ची विक्री देखील पुण्यात जाऊन केली. पण यामध्ये सगळंच नवख असल्यामुळे फायदा असा काही झालाच नाही, झाला तो सगळं तोटा च पण याच मूळे समजलं की व्यवसाय करण्यासाठी सगळ्या गोष्टीची माहित असणं किती महत्वाचं असत. यातून मिळालेला अनुभव हा सगळ्यात मोठा होता. त्या नंतर फडणीसांना मुंबई च मार्केट पाहण्याचा योग आला. तिथल सर्वात मोठं वाशी मार्केट पाहून नवीन आशा वाटायला लागली. तिथेच एक पहिली च ऑर्डर मिळाली ती मिरची ची जी दक्षिणेतून आणली होती, त्यातून बराच नफा झाला. मग डाळिंबाची ऑर्डर ही पूर्ण केली.

सुशांत यांच्या मते फक्त तुमच्या कडे भांडवल असूनच चालत नाही तर तुम्हाला या साठी तुमचा वेळ, कष्ट ही द्यावे लागतात. न थांबता घेतलेली मेहनताच नेहमी फळाला येते. म्हणून किती ही तोटा झाला तर न थांबता प्रयत्न चालूच ठेवायचे. तुमचं चांगल लक आणि तुमचे लोकांशी असणारे चांगले संबंध हेच तुमचे मुख्य भांडवल असत. ओळखीतूनच बऱ्याच ऑर्डरी मिळत जातात. यातूनच पुढे त्यांनी २००२ साली अग्रिकल्चर सप्लाय चेन याची सुरुवात झाली. २०२० ते २००६ पर्यंत दिसेल ते काम केल. कोणत काम चांगलं का वाईट हे काही न पाहता कामे केली. यातूंच सगळ्या कामांची माहिती मिळत गेली, अनुभव वाढला. आणि पुढे त्याचाच उपयोग झाला तो व्यवसायाचा पाय उभारण्यात.

२००६ साली सुशांत यांनी स्वतःची एक्स्पोर्ट कंपनी सुरु केली. हा व्यवसाय भाज्या एक्स्पोर्ट करण्याचा असल्याने इथे सर्वात मोठा तोटा होता तो भाज्या नाशवंत असतात त्या खराब होतात त्यामुळे इथे आजचे काम आजच करावे लागते ते उद्या करून चालत नाही.

२००८ साली दुबई मध्ये एक दुकान सुरु केला ज्या मध्ये समुद्रातील प्रॉडक्ट ठेवले. या मुळे व्यवसायाला चालना मिळाली. फडणीसांच्या मते, जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करता तेव्हा काही तोटे ही होतात.. काही गोष्टी चुकतात, नजर चुकीने राहून जातात…याच मूळे बऱ्याच पैश्याचा तोटा ही होऊ शकतो. अश्याच मोठ्या तोट्या ला तोंड देताना परत शून्यातून सुरुवात करावी लागते.. सुशांत नेहमी म्हणतात की हे सगळं चालू असताना सर्वात महत्वाचा असतो तो घरच्या लोकांचा, जवळच्या माणसांचा पाठिंबा. फडणीसांनी बरेच मोठे तोटे पहिले पण यावेळी कामाला आले ते त्यांचे मित्र, नातेवाईक , घराचे लोक. तरीही यातूनच उभ राहून २०१३ मध्ये मित्रांबरोबर एक कंपनी उभी केली गोल्डन कॉव्ह त्यानंतर व्हाईट ग्लोब ही कंपनी सुरु केली.
२०१३ ते २०१६ पर्यंत ३० ते ३२ कोटींचा टर्नओव्हर झाला होता.. त्यानंतर परत काही नुकसान ही पाहायला मिळालं. पण थांबायचं नाही हे ठरलेलं च .
बिझनेस म्हटलं की बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागत. लोकांना दिसतो तो फक्त त्यातला झगमगाट पण त्या साठी घेतलेले कष्ट हे त्या माणसाचे असतात, त्याच्या जवळच्या माणसांचे असतात. त्यामुळे च आज सुशांत फडणीस १५- १६ देशांमध्ये व्यवसाय करत आहेत. त्यांचा २४० कोटींचा टर्नओव्हर आहे. त्यांच्या मते सगळे जण बिझनेस करू शकतात.
मराठी माणूस बिझनेस करू शकत नाहीत हे पूर्णतः खोडून काढलेला हा यशस्वी बिझनेसमन १२०० रुपयांच्या भांडवलावर २४० कोटींचा बिझनेस उभा करू शकतो तर आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आपला स्वतः चा व्यवसाय नक्कीच सुरु करू शकेल फक्त स्वतः च्या कामावर निष्ठा हवी आणि विश्वास तर हवाच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *