इतर बातमी मनोरंजन महिला विशेष मुंबई व्हिडिओ

‘धनंजय माने इथेच राहतात’ नावाच्या नाटकातून स्वानंदी बेर्डे करणार नाट्यक्षेत्रात प्रदार्पण…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटोशूटचे व इतरही ब-याच पोस्ट ती शेअर करत असते. व यामुळे नेहमीच ती चर्चेत देखील असते. यावेळी सुध्दा ती चर्चेत आली आहे ती तिच्या इन्स्टाग्राम वरील पोस्ट मुळेच…..नुकतेच तिने इन्स्टाग्राम लाइव्ह वरून एक नवीन मोठी घोषणा केली आहे.

या लाइव्ह मध्ये तिने आपल्या नव्या येणाऱ्या नाटका बद्दल ची माहिती दिली ज्याचे नाव आहे ‘धनंजय माने इथेच राहतात’.
या नावाच्या नाटकातून स्वानंदी बेर्डे नाट्यक्षेत्रात प्रदार्पण करत आहे. हा डायलॉग तर आता जग प्रसिध्दच आहे. मराठीतला मल्टिस्टार असणारा गाजलेला चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील हा सुप्रसिद्ध डायलॉग “धनंजय माने इथेच राहता का?” हा अतिशय आवडता आणि लक्षात राहणारा सीन दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरच चित्रत आहे.

स्वानंदी पदार्पण करित असलेलं हे नाटक नितीन चव्हाण लिखित असून राजेश देशपांडे दिग्दर्शित आहे. यामध्यूनच स्वानंदी नाट्यक्षेत्रात पदार्पण करत असल्यामुळे तिने ही घोषणा आपल्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह येऊन केली. तिचा भाऊ अभिनेता अभिनय बेर्डे नंतर स्वानंदी सुध्दा चित्रपट क्षेत्रात कधी येईल याची वाट तिचे चाहते पहातच असताना ही आनंदाची घोषणा करून तिने सगळ्याच्या उत्साहात भर घातली आहे.
तिला तिच्या या नविन यशस्वी वाटचाली साठी बिंइग मराठी कडून खुप खुप शुभेच्छा !

इथंपर्यंत आलाय तर हे हि वाचून जा…

नाटकाचा पडदा ओढणाऱ्या या पोऱ्याने संपूर्ण पडदा कसा जिंकून घेतला त्याची इन्स्पायरिंग गोष्ट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *