ताज्या बातम्यामनोरंजन

‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातल्या सिंहगडावरच्या लढाईच्या चित्रीकरणाला सुरवात.

2.67Kviews

अॅक्शन डायरेक्टर सोबत तलवारबाजीच प्रशिक्षण घेतल्यानंतर अजय देवगण आणि सैफआली खानने त्यांच्या आगामी ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सिनसच्या शूटिंग ला सुरवात केली.

या चित्रपटाची शूटिंग आता महत्वाच्या टप्प्यात आली असून पुढचा एक आठवडा सुबर्बन स्टुडिओ ला अजय आणि सैफ ह्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असणार आहेत.

सिंहगडच्या लढाई वर आधारित ह्या चित्रपटाचे एक्शन डायरेक्टर रमजान बुलट यांनी कोरियोग्राफी केली आहे. रमजान बुलट यांनी आधी हॉलिवूड च्या इंफर्नो (2015) आणि रश (2012) या चित्रपटाच्या प्रोजेक्ट्स वर काम केले आहे. औरंगजेबच्या सैन्यात सेवा करणारा राजपूत अधिकारी उदयभान राठोड च पात्र सैफआली खान साकारत आहे. ह्या साठी सैफ ने सात आठवडे तलवारबाजीच प्रशिक्षण घेतलं आहे.

सूत्राने सांगितले की अंतिम फेरीसाठी एक विस्तृत सेट तयार केला गेला आहे. सैफ आणि अजय दोघे गेल्या काही आठवड्यापासून प्रशिक्षण घेत आहेत. तानाजी मालुसरे यांची सिंहगडवरची लढाई हि फार रोमांचक झाली होती आणि तशीच चित्रपटात रोमांचक दाखवण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.

Leave a Response