तंत्रज्ञान

फ्री कॉलिंगसाठी एअरटेलचा धमाकेदार प्लॅन

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लॅन घेऊन येत असतात. जिओ पाठोपाठ आता एअरटेलही ग्राहकांना खुष करण्यासाठी विविध स्वस्त आणि मस्त प्लॅन लॉंच करत आहे. काही ग्राहकांना डेटाची आवश्यकता नसते ते फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करतात. अशा ग्राहकांसाठी एअरटेलने अनलिमिटेड कॉलिंगचा प्लॅन आणला आहे.

एअरटेलने 179 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. याची मुदत 28 दिवस असणार आहे. कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या प्लॅनमध्ये 2जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅन मध्ये ग्राहकांना भारती AXA कडून 2 लाखांचा विमा कवच दिले जाते. ग्राहकांना एकूण 300 फ्री एसएमएस मिळणार आहे.

एअरटेल 379 रुपयांचा प्लॅन :

तुम्हाला जर खूप कॉलिंग करावे लागत असेल तर 379 प्लॅन तुमच्यासाठीच आहे. देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या प्लॅनसाठी 84 दिवसांची वैधता आहे. एकूण 6जीबी डेटा मिळणार आहे. ऑफरअंतर्गत FASTag खरेदीवर 150 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. दररोज 100 फ्री एसएमएस आणि विंक म्युझिक व एअरटेल एक्सट्रिम अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस मिळणार आहे.