तंत्रज्ञान

मोबाईलमध्ये नेटवर्क येत नसेल तर ‘या’ गोष्टी करा

मोबाईल मध्ये नेटवर्क नसल्याची समस्या आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे महत्त्वाचा फोन करायचा असल्यास तो लागत नाही. मोबाईल मधील इंटरनेटचा वापरही करता येत नाही. त्यामुळे अनेकदा चिडचिड होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोबाईल मध्ये नेटवर्क येत नसेल तर काय करायचे याची माहिती देणार आहोत.

मोबाईल फोन नेटवर्क सर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरीची पॉवर खर्ची होते. मोबाईल फोन चार्ज नसेल तर नेटवर्क सर्च करण्यासाठी लागणारी पुरेशी उर्जा उपलब्ध नसते. त्यामुळे मोबाईलची बॅटरी कायम चार्ज करावी. जेणेकरून नेटवर्क सर्च करण्यात अडचण येणार नाही. तसेच अनेक प्रयत्न करूनही फोनमध्ये नेटवर्कची समस्या निर्माण होत असेल तर सिग्नल बूस्टरही तुम्ही वापरू शकता. त्याला रिपीटरही म्हटले जाते. ते घरातील अशा ठिकाणी ठेवावे की जिथे चांगले नेटवर्क येते. असे केल्यास बूस्टरमुळे तुमच्या मोबाईलला नेटवर्क मिळेल.

नेटवर्कला अडथळे निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक उपकरणे अथवा वस्तू ठेवू नयेत. त्यात खोलीत कमीत -कमी वस्तू ठेवल्यास मोबाईल फोनला नेटवर्क मिळू शकेल.