तंत्रज्ञान

लॉकडाऊनमध्ये तुम्हाला घरबसल्या बॅंकेतून मागवता येणार पैसे

लोकडाऊनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी काही महत्त्वाच्या कामासाठी पैशांची चणचण भासू शकते त्यामुळे आता काळजी करु नका तुम्हाला घरबसल्या तुमच्या अकाऊंटमधले पैसे बॅंकेतून मागविता येणार आहे.

एसबीआय, आयसीआयसीआय, एक्सिस आणि कोटक सारख्या मोठ्या बँकांनी ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, घरी पैसे मागवायचे असल्यास तुम्हाला बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर Bank@homeservice लॉगइन करावं लागेल. त्याशिवाय बँकेच्या ग्राहक सेवांवर क्रमांकावर (कस्टमरकेअर) फोनही करू शकता. बँकेकडून रोकड मागण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच ही सेवा उपलब्ध असणार आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये बँकेचे प्रतिनिधी तुमच्या पर्यंत पैसे घेऊन येतील. यासाठी तुम्हाला ५० रूपये आणि १८ टक्क्यांचं सेवा शुल्क असं ६० रूपये भरावे लागतील.