तंत्रज्ञान

लॉकडाऊननंतर फ्लिपकार्टनेही वेबसाईट केली बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा केली. यापार्श्वभूमीवर आता फ्लिपकार्टने देखील आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

“काहीकाळासाठी आमच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न करु. सध्या खूप कठीण परिस्थिती आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमच्या घरी राहा, बाहेर फिरु नका”, असा मेसेज फ्लिपकार्ट वेबसाईटवर येत आहे.

याशिवाय, पेज स्क्रोल डाउन केल्यानंतर खाली COVID-19 बाबत घ्यावयाची खबरदारी, विमानतळांवर स्कॅन झालेल्या प्रवाशांची आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांची माहिती, हेल्पलाइन नंबरसह अन्य विविध महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.