तंत्रज्ञान

गुगलने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त हटके ‘डुडल’ साकारले

सर्च इंजिन गुगलचा आज 21 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने गुगलने आज स्वत:साठी एक खास डुडल (Doodle) तयार केलं आहे. अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी गुगलने डुडलद्वारे विशेष डुडल साकारून जगातील प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस साजरे करणाऱ्या गुगलने स्वत:च्या वाढदिवसाचे देखील हटके डुडल साकारले आहे.

गुगलने जुन्या कम्प्युटरच्या थ्रो बॅक फोटोचे खास डुडल यानिमित्ताने साकारले आहे. २७ सप्टेंबर १९९८ अशी तारीख त्या फोटोवर देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि प्रिंटरही पाहायला मिळत आहे. गुगलने गेल्या वर्षी डुडलवर एक व्हिडिओ प्ले केला होता. गेल्या विस वर्षांच्या आठवणींना त्या व्हिडिओत गुगलने उजाळा दिला होता.

गुगलच्या वाढदिवसाची तारीख नेहमी बदलली जाते. वर्ष २००५ पर्यंत ७ सप्टेंबर रोजी गुगल आपला वाढदिवस साजरा करत होता. यानंतर काही वर्षांनी ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरी केला. यानंतर २६ सप्टेंबर आणि आता २७ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जातो.