तंत्रज्ञान

‘स्मार्ट स्क्रीनशॉट’ असेल गुगलचं नवीन सर्च फिचर

जगातील कोणतीही माहिती गुगलवर शोधता येते हे तर आपण जाणतोच. पण आता या शोधात आणखी भर पडली आहे. हा शोध म्हणजे लवकरच स्क्रीनशॉटद्वारे इमेज शोधता येणं शक्य होणार आहे. ‘9to5 Google’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

गुगल अॅपच्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच 10.61 व्हर्जनमध्ये ‘स्मार्ट स्क्रीनशॉट्स’ नावाचा एक नवा पर्याय असेल. याद्वारे युजरने आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास त्याला गुगल सर्च हा पर्याय देखील दर्शविण्यात येईल. यावर क्लिक केल्यास त्या स्क्रीनशॉटशी संबंधित माहिती सर्च करता येईल असं सांगितलं जात आहे. पण, नेमकं कशाप्रकारे हे फीचर कार्यान्वित असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या नवीन फीचरची गुगलकडून चाचणी सुरू असल्याचं वृत्त आहे. सध्या फीचरला निवडक युजर्ससाठीच सादर करण्यात आले आहे. अपडेटनंतर सर्वांसाठी हे नवीन फिचर उपलब्ध करण्यात येण्याची शक्यता असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.