तंत्रज्ञान

आता अलेक्झाला म्हणा…”अलेक्झा बॉलीवुडके गाने सुनाओ”

व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनू पाहत आहेत.अमेझॉनने आपल्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला आता हिंदी भाषेचा सपोर्ट प्रदान केला असून आता मराठीचा क्रमांक कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

“अलेक्झा बॉलीवुडके गाने सुनाओ” अशा प्रकारच्या विविध कमांडचा वापर करता येणार आहे. यात अलेक्झाच्या विविध स्कील्सचाही समावेश आहे. अर्थातच यामुळे अलेक्झाची लोकप्रियता वाढीस लागणार आहे.

गुगल असिस्टंटने सुमारे एक वर्षाआधीच हिंदी भाषेचा सपोर्ट दिला आहे. आता अमेझॉनच्या अलेक्झालाही हिंदीचा सपोर्ट दिलेला आहे. यामुळे आता युजर्स हिंदी भाषेतून ध्वनी आज्ञावली अर्थात व्हाईस कमांड देऊन विविध फंक्शन्सचा वापर करू शकणार आहेत.