तंत्रज्ञान

जिओचा वर्क फ्रॉम होम प्लॅन; मिळेल तब्बल 102 जीबी डेटा

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. याच कर्मचाऱ्यांसाठी आता जिओनेही वर्क फ्रॉम होमचा प्लॅन आणला आहे.

जिओने ग्राहकांसाठी 251 रुपयांचा प्लॅन लॉंच केला आहे. या प्लॅन मध्ये दररोज 2 जीबी डेटा ग्राहकांना मिळेल.

डेटामर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड म्हणजे 64 kbps चा होईल. 51 दिवसांची वैधता असलेला हा केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन आहे, त्यामुळे दररोज 2 जीबी डेटासह युजर्सना एकूण 102 जीबी डेटा मिळेल. केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन असल्याने या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही.