”यश हे कुण्या ऐऱ्यागैऱ्याला मिळत नसतं, ते त्यांनाच मिळते ज्यांना ते मनातून हवं असतं” असं म्हणणाऱ्या यशस्वी मराठी उद्योजक नवनाथ धुमाळ हे बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील एका खेडेगावातले आहेत. हातात असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी नवे काहीतरी करावे म्हणून व्यवसायात उतरायचे ठरवले. कसलीही पार्श्वभूमी नसलेले नवनाथ यांनी अनुभवाच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज यश कमावले आहे.
पण त्यांच्या ह्या सर्व प्रवासात त्यांच्या सोबत एक घटना घडली. मुंबईला परिक्षेनिमित्ताने गेले असताना त्यांना विमान कस दिसतं हे जवळून पाहायचं होत. तेंव्हा ते आणि त्यांचा मित्र हे कुतूहलापोटी विमानतळावर गेले. आणि प्रचंड मोठ्या आकाराचे विमान पाहून नवनाथ धुमाळ थक्क होऊन मित्राला त्यांनी उत्सुकतेपोटी मित्राला प्रश्न केला.
”मुंबई ते लंडन किती तिकीट असेल बरं?” तेंव्हा त्यांच्या शेजारीच बसलेला एक पांढरपेशा व्यक्तीने याना जवळ बोलवले आणि कुठला आहेस, काय करतोस अशी प्रश्ने केलीत इत्यादी विचारून अगदी कुत्सितपणे बोलला कि,”आदमीने हमेशा अपनी औकात मे रेहाना चाहिये” असा अपमान सहन न होऊन धुमाळ यांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर एक नजर टाकली आणि विचारात पडले. ”यह भी दिन जायेंगे” असं म्हणत येथील पुढील संपूर्ण आयुष्यातला प्रवास हा विमानानेच करायला मिळेल इतकी प्रगती करेल याचा ठाम निर्णय घेतला.
घरात आत्तापर्यंत कुणीही शिकलेले नव्हते. शिक्षित म्हणून त्यांच्या कुटुंबात ते पहिलेच होते. कसलेही शैक्षणिक मार्गदर्शन नसतांना, बी.एस्सी, एम.एस्सी आणि एल.एल बी पूर्ण केले आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेत ते स्वकर्तुत्वाने नोकरीला लागले. हळूहळू परिस्थिती बदलत होती. पैसा, पद आणि प्रतिष्ठा सर्व काही त्यांच्याकडे असताना देखील ते मानसिकरीत्या संतुष्ट नव्हते.
लग्नानंतर त्यांच्याच एक नातेवाईकाने त्यांना त्यांच्या कंपनीचा हिस्सेदार होण्याची ऑफर दिली आणि धुमाळ यांनी ती स्वीकारली. त्यातून त्यांना त्या काळात ११हजार रुपये नफा मिळाला होता. इतके पैसे एकदम मिळाल्याचा खूप आनंद त्यांना झाला. त्या नफ्याच्या पैशांनी त्यांना त्यांचे विमानप्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. त्या विमानप्रवासाने त्यांना आणखीनच आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या मनात वेगळ्याच योजना आणि स्वप्न निर्माण होत होते. काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी त्यांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं.
त्यांनी स्टेट बँकेच्या नोकरीचा राजीनामा द्यायचे ठरवल्यावर त्यांना बऱ्याच सहकाऱयांनी वेड्यात काढलं. वरिष्ठांनी विनंती केली हि चूक करू नका, नंतर पच्छाताप होईल. त्यांना हा विचार करण्यासाठी काही वेळ दिला. पण काही दिवसांनी देखील धुमाळ हे त्यांच्या मतावर ठाम होते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली. पहिल्या ३ वर्षांत ५ कोटींचा टर्नओव्हर झाला. पण दुर्दैवाने त्यांच्या बिझिनेस पार्टनर ने विश्वासघाताने धुमाळांना कंपनीतुन काढून टाकले. अशा सर्व परिस्थितीमध्ये धुमाळ यांच्यासमोरची सर्वच परिस्थिती बदलली. होत्याचे नव्हते झाले. पण तेंव्हाही ते खचले नाही.
पुन्हा नव्या जोमाने पुन्हा एक नवी विमा कंपनी चालू केली. अगोदर झालेल्या चुका दुरुस्त करून चांगली योजना आखली. आणि ३ वर्षात होऊ शकणार टर्नओव्हर त्यांनी एका वर्षात कमावला. पाच राज्यांत आंध्रप्रदेश, कर्नाटक,गुजरात,मध्य-प्रदेश,महाराष्ट्र, गोवा मध्ये त्यांनी १७ ऑफिसेस चालू केले. हजारच्या वर कर्मचारी वर्ग असलेल्या या विमासेवा उद्योगाने गेली १७ वर्षात ४७ लाख लोकांना विमा देऊ केला. त्या माध्यमातून ३७ हजार कुटुंबामध्ये अनेक घटना घडल्या जसे कि, अपघाती मृत्यू,अपंगत्व आलेल्या कुटुंबापर्यंत विमा पोहोच केला. अशाप्रकारे भारत सरकार आणि नागरिकांमधले दुआ बनलेले नवनाथ धुमाळ याना त्यांचे ग्राहक देवतुल्य मानतात.
त्यांच्या या प्रवासाची दाखल घेत त्यांना २००७ मधील ‘इंटरनॅशनल क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाला. २००९ ला ‘जेम्स ऑफ इंडिया’ पुरस्कार मिळाला. हळूहळू ते विविध व्यवसायात उतरायला लागले. त्यांनी ‘लाईफलाईन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल’ उभे केले, मुलांना घडवलं, एका मुलाला डॉक्टर बनवलं तर दुसऱ्या मुलाला हॉटेल व्यवसायात उतरवलं. याशिवाय एलपीजी गॅस पंप, कन्स्ट्रक्शन, शेती असे विविध क्षेत्रात अविरतपणे व्यवसाय करणारे धुमाळ म्हणतात, ” ९७टक्के लोकं पैशांच्या मागे पाळतात, तर उर्वरित ३ टक्के लोकांच्या मागे पैस पळतो”. त्यांनी आलेल्या मिळकतीचा काही भाग बाजूला करून ‘अनंत चॅरिटेबल नावाने ट्रस्ट चालवितात. त्या अंतर्गत त्यांनी कोरोनाकाळात ४५ हजार लोकांना मोफत टिफिन पुरवले. तसेच ते अनेक सामाजिक उपक्रमात देखील कार्यरत असतात.