कोरोना इम्पॅक्ट पुणे बातमी मुंबई

मुंबई पुण्यासाठी सोमवारपासुन हे असतील नवीन नियम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्र अनलॉक होत आहे.अनलॉकचे पाच टप्पे करण्यात आले आहेत.त्या टप्प्याप्रमाणे आता निर्बंध वाढविले आणि कमी जाणार आहेत.प्रत्येक जिल्ह्यांचा  आठवड्याला पॉझिटिव्हिटी दर काढला जाणार आहे. या बरोबरच ऑक्सिजन बेडसची संख्या देखील ठरविली जाणार आहे.

पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे आठवड्यात निर्बंध कमी करण्यात येथील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.पण पुण्यातील निर्बंध काहीच कमी गेलेले नाहीत. पुणे महापालिकेने काढलेल्या नवीन आदेशात पुणेकरांना कोणताच दिलासा मिळालेला नाही.

जीवनावशक्य वस्तूची सोडता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.हॉटेल्स यांना देखील पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यत परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे पुणेकरांची पुरती निराशा झाली आहे.मुंबईत देखील निर्बंध तसेच असतील, ज्या प्रमाणे मागच्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते.मुंबई- पुण्याचापॉझिटिव्हिटी दर कमी झालेला असून देखील तेथील निर्बंध कमी करण्यात आले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *