इतर बातमी वायरल झालं जी

‘हा’ भारतातील सर्वात हुशार चोर ! जज बनून लावला अनेक केसचा निकाल

आजवर तु्म्ही चोरी किंवा फसवणूक करणारे अनेकजण पाहिले असतील. परंतु कधी एखादा चोर जज बनला आणि त्यानं अनेक केसचा निकाल दिला असं नक्कीच कधी ऐकलं नसेल.

आम्ही ज्या चोराबद्दल सांगतोय तो काही साधासुधा चोर नाहीये. लोक त्याला सर्वात हुशार चोर म्हणून ओळखतात. या चोराचं नाव धनी राम मित्तल आहे. चोरी प्रकरणी भारतात सर्वात जास्त अटक होणारा तो एकुलता एक चोर आहे. 1964 साली त्याला पहिल्यांदा पोलिसांनी रंगेहाथ पकडलं होतं. 2016 साली त्याला शेवटची अटक झाली होती. वयाच्या 25 व्या वर्षी त्यानं चोरी करणं सुरू केलं होतं.

धनी रामची खास बात अशी की, तो दिवसाच चोरी करतो. त्याच्याकडे एलएलबी, हँडरायटींग तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजी अशा डिग्री आहेत. त्यानं 1 हजारांपेक्षा जास्त गाड्या चोरी केल्या आहेत. गाडी चोरी करून नंतर खोटी कागदपत्रे बनवून तो त्या गाड्या विकत होता.

आणखी एक चकित करणारा प्रकार म्हणजे खोटी कागदपत्रे तयार करून धनी रामनं हरियाणातील झज्जर कोर्टाच्या अॅडीशनल सेशन जजला साधारण 2 महिन्यांच्या सुट्टीवर पाठवलं होतं. यानंतर धनी राम स्वत: जजच्या खुर्चीवर बसला होता. यावेळी त्यानं 2 हजारांहून अधिक गुन्हेगारांना जामीन दिला. काहींना शिक्षाही दिली आहे. जेव्हा त्याचं भांड फुटलं तेव्हा मात्र तो फरार झाला होता. असंही बोललं जातं की, धनी रामनं जामीनावर सोडलेल्या गुन्हेगारांना जजनं पुन्हा तुरुंगात टाकलं होतं.

अशी माहिती आहे की, धनी रामचं वय आता 81 झालं आहे. आज तो कुठे आहे आणि काय करतो याची माहिती सध्या कुणालाच नाही. कारण धनी राम आजही फरार आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *