बातमी मनोरंजन महाराष्ट्र वायरल झालं जी

देवमाणूस मालिकेची ही आहे खरी कथा, जाणून घ्या नेमका कसा होता खरा देवमाणूस

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका प्रचंड गाजत आहे.लवकरच ही मालिका निरोप घेणार आहे.देवमाणूस या मालिकेची कथा ही एका सत्य घटनेवरून घेतलेली आहे.ही घटना वाई-धोम हत्याकांड म्हणून ओळखली जाते.

2016 साली सातारा जिल्हयातील वाई जवळच्या एका गावात डॉक्टर संतोष पोळ यांनी सहा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मंगला जेधे ही अंगणवाडी सेविका बेपत्ता झाली होती.त्या प्रकरणाची चौकशी करताना संतोष पोळ यांनी केलेले सहा खून देखील पुढे आले.

संतोष पोळ यांनी 13 वर्षात तब्बल 6 खून केले होते.यात पाच महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. कबुलीच पोलिसांसमोर दिली. संतोष पोळनं सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, नथमल भंडारी आणि सलमा शेख यांचाही खून केला होता. त्याच्या हॉस्पिटल आणि घराच्या परिसरातून मृतदेह सापडून आले होते.

हे सहा हत्याकांड तर केलेच होते त्या बरोबरच गावातील अनेकांना बेपत्ता करण्यामागे देखील संतोष पोळ यांचा हात होता. 2016 मध्ये मुंबईतील दादर येथे संतोष पोळ याला अटक झाली.

संतोष पोळ यास डॉक्टर डेथ असे म्हटले जाते. पैसे आणि लुटीच्या उद्देशाने संतोष पोळ याने हे हत्याकांड केले आहेत. मालिकेतील डिंम्पल म्हणजेच नर्स ज्योती मांद्रे ही माफीचा साक्षीदार झाल्यामुळे हे सर्व प्रकरण समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *