टेक इट EASY

… म्हणून नरेंद्र मोदी उठसुठ फोटोशूट करत असतात.

एखादं चांगलं दृश्य असेल, प्रसंग असेल त्यासोबत फोटो काढण्याचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही. हे आपण वारंवार अनुभवत असतो. परंतु हा मोह दस्तरखुद्द पंतप्रधानांना सुद्धा आवरू शकत नाही. हेही आपण त्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठावर बघतच असतो या आशयाची पुष्टी करणारी माहिती काही दिवसापूर्वी प्रकाशित झाली आहे.

प्रधानमंत्री देखील आपल्या प्रतिमेला जपण्यासाठी सजग असतात हे स्पष्ट होतं. प्रसंग कुठलाही असो कॅमेराला ते अचूक हेरतात व वेगवेगळ्या पोझ आवर्जून देतात. विरोधक नेहमी त्यांच्यावर आरोप करत असतात. त्यातील काही आरोपात तथ्य असते तर काही आरोप हे तथ्यहीन असतात.

त्यापैकी एक नेहमी होणारा आरोप म्हणजे मोदींना कुठेही गेल्यावर भरपूर फोटो काढायचे असतात व सोशल मीडियावर अपलोड करत पब्लिसिटी करणे हे मोदींचे नेहमीचे काम आहे असे विरोधक म्हणतात. काही अंशी हा आरोप खरा आहे असं म्हणावं लागेल त्याचे कारण म्हणजे मोदींच्या प्रतिमासंवर्धनासाठी मोठी टीम कार्यरत असते. विमल जुलका यांच्या म्हणण्यानुसार छायाचित्र विभागामार्फत अधिक चांगले फोटो काढले जावेत. कामाचा दर्जा सुधारावा यासाठी अजून कशा सुधारणा करता येतील हा विचार मोदींचाच होता.

या अद्ययावतीकरणात पंतप्रधानांसोबत आणखी 2 प्रशिक्षित छायाचित्रकार पी एम सोबत दिले गेले.यु.पी.ए.च्या काळात ही प्रक्रिया साधी होती. फोटो काढा आणि फाईल करा पण आता तसे नाही फोटो काढून झाल्यावर प्रधानमंत्री कार्यालयाला फोटो पाठवावे लागतात तिथून मंजुरी मिळाली तर मग ते अपलोड केले जातात.

टीकाकार टीका करताना उठसुठ काहीही टीका करतात जे कि सारासार अयोग्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पीएम ची जाणारी प्रतिमा ही प्रभावी व उत्तमच जायला हवी. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि छायाचित्रकार मोदींना चित्रित करत नसून देशाचा पंतप्रधान चित्रित करत असतात.

आज सोशल मीडिया, विविध संकेत स्थळे यांमार्फत आपण जगभरातील लोकांशी, देशांशी, उद्योजकांशी जोडलेलो आहोत. त्यांच्यासमोर देशाची प्रतिमा जाताना अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी खरोखरच फोटोग्राफी डिव्हिजन अपग्रेड होणे गरजेचे होते. सार्वजनिक प्रसंगी तुमची देहबोली ही नीटनेटकी असेल तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला होतो.
मोदींच्या जागी आणखी दुसरे जरी पंतप्रधान असतील तरी या विभागाने अशाच पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *