यशोगाथा शेती

बारामतीजवळ दोन मराठमोळ्या मित्रांनी वर्षाला ७५ लाख रुपये देऊन घेतली भाडे तत्ववार १३० एकर शेती…

देशात आता ऐरणी वर असलेला मुद्दा म्हणजे शेती व शेतकरी. शेतकरी कायद्यात झालेल्या बदल मुले शेतकऱ्यांचं आंदोलन तापत चाललेलं आहे. असे असताना त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे करार शेती. या करार शेती बद्दल बरेच समज- गैरसमज समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये देखील आहेत. या शेतीत किती नफा आणि तोटा होतो हा विषय परिस्थितिजन्य असावा. ह्या प्रकार ची शेती मुख्यतः पंजाब, हरियाणा या राज्यांमधे केली जाते.

असाच एक प्रयोग महाराष्ट्रात बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आणि भिगवण च्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी दोन सामान्य शेतकऱ्यांनी केला आहे. या करार शेती चा अवलंब करून त्यांनी आपल्या पुढे नवीन उदाहरण ठेवले आहे. अंकुश पडवळे आणि अमरजित जगताप या शेतकऱ्यांनी 130 एकर मध्ये डाळिंबाचा पीक घेतल आहे.

या दोघांनी स्वतः बरोबर तरूणां देखील आपल्या बरोबर घेतले. त्यांनी या आधी बरेच नविन प्रयोग केले. शेडनेड हाऊस मधली शेती, कमी पाण्यावरच शेती, पावसाच्या प्रत्येक थेंबाच गणित, पाणी बचत, झाडाच्या पाण्याच बाष्पीभवन कस करायच वगैरे.

अंकूश पडवळे हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे आहेत तर
अमरजित जगताप हे पंढरपूर मधील वाखरी गावाचे आहेत. त्यांचं Bsc.Agriculture झाले असून अंकूश पडवळे यांनी MA BEd केले आहे.

पडवळे यांनी एवढ शिक्षण घेऊनही त्यांना शेतीची आवड फार म्हणून त्यांनी या दुष्काळी प्रदेशात चालून आलेल्या नौकरीच्या संधी डावलून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवेढ्याच्या खुपसंगी गावाचे असणारे पडवळे यांच्या वडिलांपासून शेती हाच मुख्य उद्योग घरात होता. पण त्यांची सगळी शेती ही सावकारी पाशात अडकलेली होती. पण यातूनही मार्ग काढून त्यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला.

खुपसंगी हे पावसाच्या पाण्यातलं दुष्काळी गाव. जेथे पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. अश्या या दुष्काळी पट्टयात शेती कारण म्हणजे जिकीरीच च काम होत. तरीही त्यांनी माघार न घेता नवीन प्रयोग चालूच ठेवले. शेतीला पाणी नाही म्हणून ते थांबले नाहीत. करार शेती चा हा निर्णय तास खूप च धाडसाचं होता. पण त्यांनी ते करून दाखवले. पडवळे यांना कृषी भूषण पुरस्कार २०१६ तसेच बारामतीकृषि विज्ञान केंद्राचा पहिला पुरस्कार देखील मिळाला आहे.

या सामान्य शेतकऱ्यांनी करार शेती करून अख्या महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरच उभं केला आहे. हा करार त्यांनी दिपक फेर्टीलिझर्स नी ढोले पाटीलांकडून लीज वर घेतलेल्या या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. हा तब्बल 62 लाख रुपायांचा वार्षिक करार आहे. या खाजगी कंपनी बरोबर करार करून त्यांनी हे सिद्ध केलाय की करार शेती सुद्धा नफा देते. याच उत्तम उदाहरण म्हणजे पडवळे यांनी केलेली ही शेती

 

तर काय आहे ही करार शेती?
शेती म्हणजे माणसाच्या जीवनाचा पाया आहे. जीवांच्या चक्रातील मुख्य भाग हा शेती वर अवलंबून आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारतात आज बऱ्याच विविध योजना आखून शेती केली जाते. शेती मध्ये नवनवीन प्रयोग ही केले जातात.

शेती करण्याच्या विविध पद्धतींपैकी असणारी ही करार शेती ग्राहकांच्या गरजा समोर ठेवून केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादकांकडून उत्पादन तयार करून घेतले जाते. यात एखादा मध्यस्थ, संस्था किंवा कंपनी शेतकऱ्यांशी करार करते. या शेतीत मुख्यतः मागणी तसा पुरवठा हे समीकरण महत्वाचे आहे.

या शेतीच्या पद्धतीत शेतकरी हा एकटा नसून शेतकऱ्यांच्या गटांना प्राधान्य देण्यात येते तसेच काही सहकारी संस्थांच्या माध्यमातूनही असा कार्यक्रम राबवला जातो. पंजाब राज्यामध्ये १५-२० वर्षापूर्वी या कंत्राटी शेतीला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *