वायरल झालं जी

चिडलेल्या हत्तीनं केला टेम्पोचा चुराडा; व्हिडिओ व्हायरल

एका चिडलेल्या हत्तीने रस्त्यातच धुडगूस घातला आहे. या हत्तीने रस्त्यावरुन जाणाऱ्या टेम्पोच्या बोनेटवरच जावून हल्ला केला. आणि बोनेटचा चुराडा केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कर्नाटकातील नागरहोल नेशनल पार्क येथे हा प्रकार घडला आहे. ट्विटर यूजर माइकल ड्वायर यांनी 51 सेकंदाचा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर पोस्ट केला. यामध्ये हत्तीचा राग तुम्ही पाहू शकता. त्याने कशापद्धतीनं टेम्पोवर हल्ला केला ते या व्हिडिओमध्य़े दिसत आहे. आपल्या सोंडेनं हत्तीनं या टेम्पोचा बोनेट तोडला. माइकल ड्वायर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटरवर घडलेल्या घटनेचं कॅप्शन लिहून व्हिडिओ पोस्ट केला आहे.

घटनेनंतर टेम्पोची काय अवस्था झाली आहे हे सांगण्यासाठी हा फोटो शेअर करण्यात आला आहे. चिडलेल्या हत्तीनं आपल्या सोंडेनं टेम्पोचं मोठं नुकसान केलं आहे.