वायरल झालं जी

कोरोनामुळे चिमुकलीचा असा झाला वाढदिवस साजरा; व्हिडिओ व्हायरल

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे सर्व जगातील लोक घरात लॉकडाऊन आहेत. भारत देखील 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे लॉकडाऊन मधील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही भावूक व्हिडिओ देखील आहे.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील एका 8 वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस आहे. पण तिच्या वाढदिवसाला लॉकडाऊनमुळे कोणाला येता आले नाही. त्यामुळे ही चिमुकली घराच्या बाहेर आली आहे आजुबाजुच्या घरांमधून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात होते. एका सुरात शेजारच्या घरातले लोक तिला शुभेच्छा देतात. यावेळी शुभेच्छांमुळे भारावलेली चिमुकली रडताना दिसते. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.