वायरल झालं जी

कर्फ्यू दरम्यान ‘या’ तरुणाला आली तंबाखूची तलफ मग पुढे झालं काय तुम्हीच पाहा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले  होते. त्यामुळे रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र या दिवशी बंद ठेवण्यात आला होता. पण काही महाशयांनी हा जनता कर्फ्यू पाळला नाही आणि घराबाहेर पडले. यातील एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाला वाहतूक पोलीसांनी चांगलाच धडा शिकविला आहे.

या व्हिडीओ मधील तरुणाला तंबाखूची तलफ आल्यानं तो घराबाहेर पडला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकीकडे नागरिकांसह प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना अशा प्रकारची कारण सांगून हा तरुण बाहेर फिरत होता. या तरुणाला वाहतूक पोलिसांनी दांड्यानं फटके देऊन घरी जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युझर्सनी पोलिसांना दिलेल्या शिक्षेचं समर्थन केलं आहे. सरकारचे आदेश न पाळणाऱ्यांना अशीच शिक्षा व्हायला हवी असं एका युझरनं म्हटलं आहे.