वायरल झालं जी

अन् सापाला पाहून ‘ती’ घाबरली, मात्र तो साप नव्हताच….तर…

कोणालाही जर रस्त्यात अचानक साप दिसला तर प्रत्येकाची बोबडी वळेलच. असाच एक किस्सा एका तरुणीच्या बाबतीत घडला. आणि हा प्रसंग तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. सध्या ही पोस्ट फेसबुकवर चांगलीच व्हायरल होत आहे.

झाले असे की, फेसबुक युझर फातिमा दाऊदला तिच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये एक साप दिसला. या सापाला पाहून ती जोरजोरात ओरडली. तिचे ओरडणे ऐकूण तिच्या समोरुन जाणारी एक वयस्कर महिला देखील घाबरली. पण फातिमा सांगते की, तो साप नव्हताच. त्यामुळे मी आज फेसबुकच्या माध्यमातून त्या वयस्कर महिलेची माफी मागते असेही ती म्हणाली आहे. तर आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, तो साप नव्हता तर मग काय होते.

फातिमा म्हणते की, हा साप नसून एका महिलेची खोटी वेणी होती. हे जेव्हा मला कळाले तेव्हा मला देखील हासू अनावर झाले होते. जर कोणाची वेणी हरवली असेल तर घेऊन जा. वेणीचे काहीही नुकसान झालेले नाही. असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली. तिनं या सापाचा फोटोही फेसबूकवर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट 2 हजारहून अधिक लोकांनी शेअर केली असून तर हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट केली आहे.