वायरल झालं जी

कोरोनाशी लढणाऱ्यांना कचरावेचकाने केला सलाम; व्हिडिओ झाला व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर 22 मार्चला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या कर्फ्यूला नागरिकांनी चांगला पाठिंबा दिला. आणि संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी रुग्णालयात सेवा करणारे डॉक्टर, जवान, पोलिसांसह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे नागरिकांनी टाळ्या आणि थाळी वाजवून कौतुक केले आणि त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक कचरा गोळा करणारी व्यक्ती रस्त्यात उभी राहून टाळ्या वाजवताना दिसते. कचरा गोळा कऱणाऱ्या व्यक्तीने रस्त्याच्या मधे उभे राहून देशसेवा करणाऱ्या लोकांचे आभार मानल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग याने शेअर केला आहे.

 

एका घरासमोर रस्त्यावर उभा असलेला आणि खांद्याला पिशवी अडकवलेला हा माणूस टाळ्या वाजवत आहे. व्हिडिओमध्ये तो टाळ्या वाजवत असताना इतर लोकही थाळी वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना हरभजन सिंगने म्हटलं की, आपण सर्व एक आहोत.