वायरल झालं जी

‘या’ शिक्षिकेची 9 चा पाढा शिकविण्याची भन्नाट पध्दत; शाहरुखही झाला आवाक्, व्हिडिओ व्हायरल

विद्यार्थ्यांना जर शाळेत प्रश्न विचारला की, तुम्हाला कोणत्या विषयाची सगळ्यात जास्त भीती वाटते तर विद्यार्थी गणिताचा विषय अवघड जात असल्याचे सांगतात. मात्र काही शिक्षक मुलांमध्ये गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी सोप्या पध्दतीने विविध आयडीया वापरुन विद्यार्थ्यांना गणित शिकविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मुलांना त्या विषयाची भिती वाटत नाही. अशाच एका शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही शिक्षिका अगदी सोप्या पध्दतीने मुलांना 9 चा पाढा शिकवित आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या शिक्षिकेचे कौतुक वाटेल. कारण आपल्या दोन्ही हाताच्या बोटावर मुलांना त्या 9 चा पाढा शिकवित आहे. या व्हिडिओमध्ये, शिक्षिकेने एका मुलीला उभे केले आणि हाताचा कॅल्क्युलेटर वापरून गुणाकार केला. असा गुणाकार तुम्ही कधीच पाहिला नसेल.

ट्वीटरवर हा व्हिडिओ अपलोड करताना आनंद महिंद्राने यांनी, ‘काय? मला या शॉर्टकटबद्दल अजिबात माहिती नव्हती. माझी इच्छा आहे की ही माझी गणिताची शिक्षिका असावी. असे झाले असते तर मी गणितात नेहमी चांगले मार्क्स मिळवले असते’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

या शिक्षकांच्या शैलीने शाहरुख खान देखील खूप प्रभावित झाला आहे. त्यांनी हा व्हिडिओ रीट्वीट करत लिहिले की, या साध्या कल्पनेने माझ्या आयुष्यातील किती गणितांच्या समस्या सुटल्या आहेत’.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत आठ हजार लोकांनी रीट्वीट केला आहे आणि 29 हजार लोकांनी लाईक केला आहे.