वायरल झालं जी

आश्चर्यकारक; डोंगरावरुन वाहतोय चक्क आगीचा धबधबा; व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक डोंगरावरुन वाहत असलेला आगीचा धबधब्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एवढा तुफान व्हायरल होत आहे की, याला आत्तापर्यंत 30 लाख लोकांनी पाहिला आहे.

मात्र या आगीच्या धबधब्यावर अनेक जण प्रश्नही उपस्थित करत आहेत. आगीचा धबधबा जगात कुठे आहे का? व्हिडीओत दिसत असलेला असा धबधबा प्रत्यक्षात आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आगीचा असा कोणताही धबधबा अस्तित्वात नाही असल्याचे समोर आले आहे.

हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील एका धबधब्याचा आहे. हा वॉटर फॉल हॉर्सटेल फॉल या नावानं ओळखला जातोय. हा  धबधबा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन आठवड्यासाठी नारंगी आणि लाल रंगाचा होता. सूर्याची किरणं जेव्हा सरळ रेषेत धबधब्यावर पडतात तेव्हा धबधबा लाल रंगाचा दिसतो. सूर्याची किरणं एवढी प्रखर असतात की धबधबा आगीसारखा दिसतो. कधी कधी तर धबधबा ज्वालामुखी सारखा दिसतो.