वायरल झालं जी

पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना तरुणाने पकडले कान; व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा देत असताना एक तरुण टीव्ही समोर बसला आणि त्याने चक्क कान पकडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या टीक-टॉक व्हिडिओतील तरुण मोदींचे भाषण सुरु असताना कान पकडून बसला होता, आणि तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत होता. मोदीजी नेट बंद करू नका प्लीज असं हा तरुण मोदींना हात जोडून विनंती करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत 6 हजार लोकांनी पाहिला आहे.

 

@amitkumar0981Net band mat karna modi g live ! ##21daylockdown ##coronavirus ##coronaviruschallenge♬ original sound – Amit Kumar