वायरल झालं जी

प्रिती झिंटा म्हणते ‘या’ गायीकडून काही तरी शिका…

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

प्रितीने एका गाईचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही गाय वाहतुकीचे नियम पाळताना दिसत आहे. ही गाय रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण जेव्हा सिग्नलला लाल दिवा लागतो तेव्हा ती इतर वाहनांप्रमाणे स्वतः उभी राहते. प्रितीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ‘आता या गायीकडे बघून वाहतूकीचे नियम कसे पाळले जातात ते शिका. त्यामुळे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे.