मनोरंजन महिला विशेष

रेल्वे मधील लोकांचे निरीक्षण करत करत विशाखा बनली आता बनली आहे विनोदाची महाराणी…

एखाद्या व्यक्तीस रडविणे जरा सोप्पे आहे. पण एखाद्याला त्याचा सर्व ताण-तनाव,दुख विसरायला लावून हसविणे फार अवघड आहे. महिलांना विनोदी भूमिका करणे जमतं नाही.असं आधी म्हटलं जायचं,पण आता मात्र तसं राहिलेलं नाही.उत्तम -उत्तम कॉमेडी करणाऱ्या अनेक अभिनेत्री सध्या आपल्या समोर आहेत.यातील एक नाव म्हणजे विशाखा  सुभेदार होय.

विशाखा म्हणजे 100 % मनोरंजन हे ठरलेलं आहे. एक सर्वसामान्य मुंबईची मुलगी ते विनोदाची महाराणी हा विशाखाचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता.पण विशाखा तिच्या कष्टाबद्दल अगदी सहज सांगते,ती म्हणते मी काही वेगळं केलं नाही.सर्वसामान्य माणूस जे कष्ट मेहनत करतो.ते मी केलं.

आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळत नसते.त्यासाठी संघर्ष करावा लागतो.तुम्ही जो संघर्ष केला आहे, तो मी देखील केला आहे.त्यामध्ये वेगळं असं काही नाही.ठाण्यातील एका सर्वसामान्य घरात 22 मार्च 1976 रोजी विशाखा जन्म झाला.तिने ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले.फार कमी लोकांना माहीत असेल पण विशाखा उत्तम भरतनाट्यम नृत्य करते.

नृत्याची तिला बालपणापासूनच आवड होती.1 जून 1998 ला महेश सुभेदार यांच्याशी विशाखाचा विवाह झाला.विवाह नंतर विशाखा अंबरनाथ येथे राहण्यासाठी गेली.इंजिनियर असणारे महेश हे एक डबिंग आर्टिस्ट वअभिनेते आहेत. विशाखा लग्नाअगोदर आणि लग्नानंतर देखील काही दिवस डान्स शिकवत.या बरोबरच ती सेल्स गर्ल म्हणून ड्रेस देखील विकत. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ठरविले.यासाठी अंबरनाथवरुन ती रोज लोकलने मुंबईला येत. या प्रवासात ती आजूबाजूच्या लोकांचे बारीक निरीक्षण करत.तिची हीच निरीक्षण करण्याची सवय तिला तिच्या विनोदी भूमिका निभावताना उपयोगी पडली. तिच्या प्रत्येक विनोदी भूमिकेत ही पात्र कोठेना कोठे दिसून येतातचं.

प्रेक्षक तिच्या विनोदांवर खळखळून हसतात. विशाखा यांनाअभिनय नावाचा एक मुलगा आहे. अभिनय तिचा मुलगा कमी आणि एक चांगला मित्रच जास्त आहे. ते दोघे एकत्र खूप मज्जा करतात. का रे दुरावा, शेजारी शेजारी पक्के शेजारी , आंबट गोड या मालिकांमध्ये विशाखाने काम केले आहे. विशाखाला खरी ओळख मिळाली ती कॉमेडी शोमधून फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन,महाराष्ट्राची  हास्य जत्रा या शो मधून विशाखा प्रेक्षकांच्या मना-मनात आणि घरा-घरात पोहचली.

नवरी नटली सुपारी फुटली,सुंदर माझे घर,बालक- पालक, बालगंधर्व यासारख्या सुपर हीट सिनेमात देखील विशाखाने भूमिका केल्या आहेत. शांतेच कार्ट सुरूआहे, एक डाव भटांचा,यांच करायचं काय ही विशाखा सुभेदार यांची गाजलेली नाटकं. पंढरीनाथ कांबळे,प्रसाद खांडेकर आणि विशाखा सुभेदार या तिघांची जोडी म्हणजे विनोदाची 100 % हमी. विशाखा जेव्हा जेव्हा मंचावर येतात तेव्हा कित्येकाना अगदी पोट धरून हसवतात. त्याच्या अभिनयामुळे आज त्यांनी कित्येक लोकांच्या चेहऱ्यावर हास्याची एक वेगळी लखेर आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *