कोकण पश्चिम महाराष्ट्र बातमी महाराष्ट्र

आम्ही पूरग्रस्त भागात बोटीवर बसून निर्णय घ्यायचो,तुम्ही डायरेक्ट फिल्डवर उतरा – चंद्रकांत पाटील

राज्यांत पुरस्थिती निर्मा+ण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो बोटीत बसून निर्णय घ्यायचो.प्रशासनाला कामाला लावायचो.आता भयावह परिस्थिति निर्माण झालेली आहे.त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फील्डवर उतरावं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा,असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मिडीयाला हे आवाहन केले आहे.आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत होतो, मदत देखील करत होतो पण कॉंग्रेस मात्र टीका करत होते,त्यामुळे माझे सत्ताधारी पक्षाला आवाहन आहे,तात्काळ निर्णय घ्या,लोकांना मदत करा. अनेक इमारती पाण्याखाली आहेत,मुख्यमंत्री मात्र मातोश्रीवर बसले आहेत,ते वर्षा बंगल्यावर देखील नाहीत किंवा मंत्रालयात देखील नाहीत.

मी स्वता सकाळी सात पासून तेथे आहे.हा राजकारणाचा भाग नाही पण हे चुकीचे आहे.त्यांनी मंत्रालयात यायला हवे.वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत.आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत पण त्यांना कोणतीच मदत नको आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *