Untold Talkies बातमी ब्लॉग महिला विशेष वायरल झालं जी विदेश

काय सांगता ? हो, ‘ही’ महिला चक्क बॅगेत घेऊन फिरते तिचं हृदय ! जाणून घ्या कारण

तुम्हाला माहित आहे का एक महिला अशी आहे जी कायम बाहेर जाताना एक बॅग सोबत घेऊन जाते. ऐकायला विचित्र वाटले परंतु या बॅगेत तिचं हृदय आहे. होय हे खरं आहे. ब्रिटनची रहिवाशी असलेल्या या महिलेचं नाव सल्वा हुसैन आहे. 39 वर्षीय सल्वाचं हृदय छातीत नसून तिच्यासोबत असलेल्या बॅगेत आहे. एवढं दु:ख झेलूनही ती कायम हसत राहते. सल्वाचं लग्न झालं आहे. तिला दोन मुलं आहेत.

सल्वा सोबत नेमकं काय घडलं होतं ?

ही घटना 2017 सालची आहे. अचानक एकदा सल्वाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तिला हृदयाचा गंभीर आजार असल्याचं समोर आलं. तिच्या काही टेस्ट केल्यानंतर समजलं की, तिला हार्ट ट्रान्सप्लांट करणं शक्य नव्हतं. त्यामुळं आर्टीफिशियल हृदय लावण्याचा एकच मार्ग समोर होता. डॉक्टरांनी तिचं हृदय काढून त्याजागी एक कृत्रिम प्रत्यारोपण करून तिच्या पाठीवर एक स्पेशल युनिट लावलं.

 

सल्वाच्या बॅगेत काय काय आहे ?

सल्वाच्या बॅगेत बॅटरी, इलेक्ट्रीक मोटार आणि एक पंप ठेवला आहे. या बॅगेत दोन प्लास्टिक ट्युबही जोडल्या आहेत. या ट्युब त्यांच्या नाभीतून फुप्फुसापर्यंत पोहोचतात. या ट्युबच्या माध्यमातूनच छातीत प्लास्टिकच्या चेंबरपर्यंत हवा पोहोचवली जाते. यामुळं सूपूर्ण शरीरात ब्लड सर्क्युलेशन होतं.

सारखी सोबत असावी लागते एक व्यक्ती

मोटरला पावर देण्यासाठी सल्वाच्या बॅगेत बॅटरीचे दोन सेट असतात. एक दुसरं युनिट हे स्टँडबाय मोडवर असतं. जेणेकरून पहिलं फेल झालं तर लगेच दुसरं वापरलं जाईल. यासाठी तिच्यासोबत सारखी कुणीतरी असतं. कारण सल्वाला एकटं सोडणं धोकादायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *