सर्वांच आवडत्या व्हाट्स अँप ने या नव्या वर्षात अटी व शर्ती आणून नेटकर्यांना नाराज केले आहे. त्यांनी सांगितलेली अट कि, आमच्या प्रायव्हसी पॉलिसी मान्य करा अन्यथा तुमचे व्हाट्स अँप बंद होईल’, त्यामुळे काहींनि व्हाटस अँप ला पर्याय शोधत आहेत. युझर्स संख्येचा विचार केला असता व्हाट्सअँप हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं अँप आहे. तर जगातील दुसरं अँप ‘टेलिग्राम’ आहे. टेलेग्रामचे ४०० मिलियन प्रति महिना ऍक्टिव्ह युझर्स आहेत. तसेच सिग्नल अँप तिसऱ्या क्रमांकावर आहे. व्हाटसअँप ने नवीन पॉलिसी आणल्यामुळे युझर्स आता टेलिग्राम आणि सिग्नल अँप कडे वळू बाळगली आहेत.तयामुळे व्हाट्स अँप ला आता चांगलाच फटका बसला आहे.
भारतात व्हाट्स अँप ला मागे टाकत सिग्नल ने पहिलं स्थान पटकावलं आहे. तसेच या यादीत जर्मनी, फ्रांस, ऑस्ट्रिया , फिनलँड, हॉंगकॉंग, स्वित्झर्लंड देखील आहेत जिथे सिग्नल अँप अव्वलस्थानी आहे.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी आणि अलीकडेच जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वलस्थानी येऊन बसलेले इलॉन मस्क यांनी ट्विट करत सांगितले कि ‘मी स्वतः हे अँप वापरतो आणि ते सुरक्षित असून त्याचा वापर चांगल्याप्रकारे होऊ शकतो’. मस्क यांनी सांगितल्या मुळे सिग्नल अँप ची लोकप्रियता अजून वाढली आहे.