प्रेरणादायी

पारंपरिक वस्त्र संस्कृती जतन करून २१ व्या वर्षी बनली उद्योजीका : चैताली भोईर

9.07Kviews

आई शिवणकाम करणारी, वडील रिक्षा चालवणारे. संसाराचा गाडा ओढण्याचे काम सुरू होते मात्र जसा अंधारात काजवा चमकावा त्याचप्रमाणे संभाजी चौधरी यांची कन्या चैताली हिने आईच्या शिवण कामातून काहीतरी नवीन करण्याचा मनावर घेतले.

फॅशन डिझायनर होऊन त्यातच तिने नऊवारी साडीला रेडीमेड तयार करून देण्याचे काम केले.
अवघ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी उद्योजक होण्याचे ठरवून पिंपरी-चिंचवड शहरात दर्शन हॉल समोर नऊवारी नार हे दुकान चालू करताच फार कमी कालावधीत सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे.

स्वतःच्या जिद्दीने व कष्टाच्या जोरावर कोणतेही काम अवघड नसते हे चैताली ने सिद्ध केले. काळा रूपाने पेहराव ही बदलत असताना आधुनिक काळातील युवती असून सुद्धा पारंपारिक वस्त्र संस्कृती जोपासण्याचे कार्य चैताली करत आहे. महाराष्ट्राची ओळख नऊवारीच्या लावणी सम्राज्ञीनिं अनेकांच्या मनावर नखरेल अदाकारांनी अधिराज्य गाजवले. मराठमोळं ऐटबाज डौलदार परंपरेचं लेण म्हणजेच नऊवारीच्या पारंपारिक मूळ रुप टिकून फॅशन डिजाईनचे कौशल्य वापरून तिला नेसायला सहज आणि सोपा होईल असे त्याच्यात विविधता चैताली ह्यांनी आणली.

आज नऊवारीचा उद्योग उभा करून शेकडो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. यानिमित्ताने संस्कृती संवर्धन व जतन करत नऊवारीच्या व्यवसायाला चालना दिली. यामधून नऊवारी , ब्राह्मणी, कोल्हापुरी मस्तानी, शाही मस्तानी,म्हळसा, मराठमोळा काष्टा , कोळी आधी साड्यांचे डिझाईन बनविले आहेत. देश विदेशात नऊवारी साड्या पोचवल्या जात आहेत शेकडो प्रकार सहज उपलब्ध होत आहेत.

छोट्या उद्योगातून सुरवात करून आज स्वयं रोजगार उपलब्ध करून चैताली भोईर ह्यांनी चिंचवड व भोसरी यथे आपल्या शाखा सुरू केल्या आहेत.
त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१८, खानदेश रत्न, वस्त्र संस्कृती पुरस्कार, युवा उद्योजिका’, आदी पुरस्करांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

आपला उद्योग, व्यवसाय सुरू करून उद्योजिका होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांन साठी चैताली ह्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

चैताली ह्यांच्या ह्या कार्यचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि म्हणूनच ह्या महिला दिनी ‘चैताली भोईर’ हिला Being Marathi ची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक वर्गाचा मानाचा मुजरा करत आहे!

1 Comment

  1. ताई च्या कार्याला मानाचा मुजरा.अशीच उत्तरोत्त प्रगती होऊदेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना

Leave a Response