लेख

स्त्री तुझी कहाणी- ऋतुजा देशपांडे

579views

स्त्री तुझी कहाणी..

कधी होतेस तानुल्याची आई, कधी भुकेल्याची माऊली तर कधी गरिबांची साऊली, किती वर्णू तुझे नाना रूप..
तुझे कर्तव्य आणि खंबीरपणा पाहून येईल प्रत्येकालाच नवा हुरूप..
स्वतःकडे करून दुर्लक्ष करत असतेस सतत दुसऱ्याची सेवा..
आपल्या अमूल्य हसण्याने सर्व दुःख लपवतेस सातत्याने मागतेस केवळ दुसऱ्यासाठी दुवा..

अशा या स्त्री ला मानाचा मुजरा आणि कर्तृत्वाला सलाम कारण स्त्री ची थोरवी शब्दात लिहावी तितकी कमीच..
लहानपणी आपल्या बाबांची लाडकी परी असते, आपल्या पावलाने घरभर ताबा घेऊन सर्वांना आनंद वाटत असते, कालांतराने उंबरठ्यापलीकडे दुसऱ्या एका नवीन जगात रममाण होते आणि सर्वाना सामावुन घेते, सर्वाना सोबत घेऊन चालत नात्याच्या खुणा घट्ट करते..
मनस्वी होऊन दुसऱ्याच्या मनाचा आढावा घेत असते..
परंतु हे सर्व करत असताना स्वतः साठी असं काहीच करत नसते..
निरंतर दुसऱ्यासाठी झटून, आनंदात आनंद मानून स्वतःच अस्तित्व विसरते.

“स्त्री मुक्ती” दिनी च नव्हे तर तिने तिला हवं ते करावं, स्वतंत्र जगावं, मनमोकळा श्वास घेऊन फुलपाखरा प्रमाणे उडावं,कुणाची तमा न बाळगता गगनात उत्तुंग भरारी घ्यावी.
कुणाला न घाबरता निशस्त्र तर प्रसंगी सशस्त्र होऊन परिस्थितिला दोन हात करावे, स्वतःच स्वतःची ढाल बनून आपले रक्षण करावे आणि स्त्रीत्व जपावे…..
शेवटी म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे काही खोटं ठरणार नाही.. खरंय ना???

कवियत्री: ऋतुजा देशपांडे

2 Comments

Leave a Response