इतर बातमी ब्लॉग वायरल झालं जी विदेश

नुकतीच जगातील सर्वात मोठ्या सशाची मालकीणीच्या घरातून झाली होती चोरी ! शोध घेणाऱ्याला लाखोंचं बक्षिस

जगातील सर्वात मोठा ससा ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे तो चोरीला गेला आहे. 129 सेमी लांबीचा हा ससा त्याच्या मालकीणीच्या घरातून चोरी झाला आहे. वेस्ट मर्सिया पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. सशाच्या मालकीणीनं सशाचा शोध घेणाऱ्याला बक्षिस देखील जाहीर केलं आहे. हा सशा शोधणाऱ्याला 2000 पाऊंडचं बक्षिस मिळणार आहे. म्हणजेच जवळपास 2 लाखांच्या वर हे बक्षिस आहे. आधी हे बक्षिस 1000 पाऊंड होतं परंतु ससा लवकर मिळेन म्हणून दु:खी झालेल्या मालकीणीनं बक्षिसाची रक्कम दुप्पट केली आहे.

शनिवारी जगातील सर्वात मोठा ससा 10 एप्रिल ते 11 एप्रिल च्या रात्री चोरी झाला आहे. मालकीणीच्या बागेतील एका झुडुपामागे बसलेला असताना याची चोरी झाली आहे. सशाच्या मालकीणीनं ट्विट करत याबाबत माहिती देत बक्षिस जाहीर केलं आहे. सशाचं नाव डॅरियस (Darius) असून मालकीणीचं नाव एनेट एडवर्ड्स (Annette Edwards) आहे.

डॅरियस या सशाचं नाव 2010 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलं होतं. सशाच्या मालकीणीला या घटनेमुळं खूप दु:ख झालं आहे. तिनं बक्षिस जाहीर करत हा ससा परत करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी ती 1 लाखांचं बक्षिस देत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *