इतर बातमी ब्लॉग मनोरंजन

माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रेडिओ झाला ११० वर्षांचा : जागतिक रेडिओ दिनविशेष

आज १३ फेब्रुवारी, हा दिवस २०११ साला पासून ‘यूनेस्कोने’ जागतिक रेडिओ दिन म्हणून घोषित केला. तेव्हा पासून या दिनाचे हे १० वे वर्ष.

११० वर्षांपासून मनुष्यजातीचे मुख्य करमणूकीचे साधन असलेला रेडिओ १८९५-९६ च्या जवळपास तयार करण्यात आला. याचा शोध पहिल्यांदा ‘गूगेमो मार्कोनी’ यांनी लावला. पण त्यांच्या नंतर ही नविन नविन सुधारणा रेडिओ मध्ये होत गेल्या
व तो १९०० मध्ये वापरण्या योग्य मानला जाऊ लागला. त्यानंतर रेडिओचा वापर व्यावसायिकरित्या होऊ लागला. २३ डिंसेंबर १९०० साली ‘रेगिनाल्ड फासिडेन’ हा कँनेडियन संशोधक पहिल्यांदा १.६ किलोमीटर वर ‘ध्वनी’ म्हणजे वायरलेस टेलिफोनी पाठवणारा पहिला माणूस ठरला. आणि सहा वर्षानंतर त्याने परत क्रिसमसच्या संध्येला १९०६ मध्ये पहिल्यांदा पब्लिक वायरलेस बॉडकास्ट केले. पुढे हिच वायरलेस सिस्टिम १९१० नंतर ‘रेडिओ’ या नावाने प्रचलित झाली. म्हणजे २०२१ हे चालू वर्ष रेडिओ च्या वापराचे ११० वे वर्ष आहे.

तब्बल ११० वर्षापासून मनूष्याचा मनोरंजनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या रेडिओ चे महत्व आज ही जपणारी माणसे पाहायला मिळतात. या वेगवेगळ्या गँजेटस् च्या काळातही रेडिओ चे चाहते आहेत हे पाहून रेडिओचा जनमाणसावर असणारा प्रभाव आपल्या लक्षात येतो. या २१ व्या शतकात, जग खूप डिजिटल झालं असलं तरी रेडिओ सारखं माध्यम दुसरे कोणतेच नाही.

आजही बऱ्याच लोकांच्या घरात रेडिओचा आवाज ऐकायला मिळतो तेव्हा सुखकर वाटते की अजूनही या सुंदर शोधाचे महत्व जपणारे लोक शिल्लक आहेत. त्यातूनही आज जर आपण जेव्हा टि.व्ही., मोबाईल हे काही नव्हते आणि फक्त रेडिओ हेच मनोरंजनाचे माध्यम होते, त्याकाळचे किस्से जेव्हा आपल्या वडिलांकडून, आजोबांकडून ऐकायला मिळतात तेव्हा खऱ्या रेडिओचं महत्व आणि त्याची गरज लक्षात येते.
तसेच रेडिओ हे फक्त मनोरंजनाचे साधनच नव्हे तर तो जनमाणसांचा साथी, मित्र ही होता, हे पटते. रेडिओ वरिल विविध गाण्यांचे कार्यक्रम, रेडिओ वर ऐकलेला क्रिकेटचा सामना या जून्या अल्हादायक आठवणी आजही किती तरी जणांसाठी मोलाच्या असतील.

अजून ११० व्या नंतर रेडिओचे रुप थोडे पालटले असले तरी विविध FM Channels च्या रुपाने तो आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. लोक आजही हे नवे रुपातले रेडिओ शो अगदी मनापासून ऐकतात. व लोकांच्या मनोरंजनासाठी रेडिओवर जे नवनविन प्रयोग हे RJ म्हणजे रेडिओ जॉकी (निवेदक) करतात हे खरच वाखाणण्या जोगे आहे.  यात काही प्रसिध्द RJ ची नावे आपण घेऊ शकतो. जसे की रेड FM ची RJ श्रुती, रेडिओ सिटी ची RJ शोनाली, 95 बिग FM चा RJ  बंड्या, तसेच RJ मिताली, RJ सोहम यांच्या बोलण्याच्या खुमारदार शैलीने, त्यांच्या विविध कलेने हे सगळे आपल्याला रेडिओच्या माध्यमातून मनोरंजन करत असतात. आणि या सर्वामुळे आजही रेडिओ ऐकण्याची परंपरा अबाधित राहण्यास हातभारच लागत आहे.

लोक मनोरंजन या एकमात्र कार्यासाठी रेडिओ आजही आपला लाडका आहे. आज या जागतिक रेडिओ दिना निमित्त आपणही हे मनोरंजानाचे महत्वाचे साधन काळाच्या वेगात , डिजिटल दुनियेच्या झगमगाटात कोठे तरी हरवू नये यासाठी प्रयत्नशील असायला हवे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *