कोरोना इम्पॅक्ट ब्लॉग लाइफफंडा

तुमच्याकडे पासपोर्ट/व्हिसा नाहीये? तरीही तुम्ही ‘हे’ देश फिरू शकता बर का..

आता लॉकडाउन हि संपला आता सर्वच पर्यटनप्रेमी फिरायला जायचे प्लॅन्स करत असणार ना?

जर बाहेर देशांत फिरायला जायचे तुमचे प्लॅन्स असतील तर, हि माहिती नक्कीच तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आम्ही तुम्हाला असे काही देशांची माहिती सांगणार आहोत जिथे व्हिसा आणि पासपोर्ट ची आवश्यकता नसते. म्हणजेच तुम्ही विना व्हिसा आणि भारतीय पासपोर्ट वर ‘त्या’ देशांना फिरायला जाऊ शकता. आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावे या उद्देशाने भारतीय नागरिकांजवळ व्हिसा नसतांनादेखील प्रवास करता यावा, तेथील सुंदर पर्यटन स्थळ पाहता यावे या उद्देशापोटी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच व्हिसा ऑन अराइवल सुविधा देणाऱ्या देशांची संख्या वाढवण्याचाही प्रयत्न सरकार करत आहे.

आपल्या देशाच्या पासपोर्टला जागतिक स्तरावर किती महत्व आहे किंवा एखाद्या ठराविक देशाचे दुसऱ्या देशासोबत असलेल्या संबंधांनुसार व्हिसाचा प्रकार ठरवला जातो. तसेच तेथील पर्यटनाची संधी मिळते का हेही पासपोर्टच्या निकषांवर अवलंबून असते. या ‘पॉवरफुल पासपोर्ट’ च्या यादीत जपान देश टॉप ला आहे तो पासपोर्टवर जगातील १९१ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतो. आपण भारतीय ८४व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपण व्हिसा शिवाय जगातल्या ४७ देशांमध्ये फिरू शकतो. तर ११ देशांमध्ये ई-व्हिसा ने आपण जाऊ शकतो.

जगात असे काही देश आहेत जिथे पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा ची आवश्यकता नाही. ते पुढीलप्रमाणे, बारबाडोस, भूतान, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, हाँगकाँग SAR, मालदीव, मॉरिशस, मोंटसेराट, नेपाळ, नीयू द्वीप, समोआ, सेनेगल , त्रिनिदाद आणि टोबैगो, सेंट विंसेंट आणि ग्रेनेडाइंस, सर्बिया, अल सॅल्वेडोर, फिजी, जमैका, सेंट किड्स अँड नेव्हीस, इक्वाडोर इत्यादी व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देणार्‍या देशांमध्ये इराण, इंडोनेशिया आणि म्यानमार यांचा समावेश आहे आणि श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया या २६ देशांच्या गटात ई-व्हिसा सुविधा आहे.

फक्त भारतीय पासपोर्टवर तुम्ही काही गाजलेली आणि सुंदर देश फिरून येऊ शकता ते म्हणजे, भूतान मधील बुद्धाची मंदिरं आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य प्रसिद्ध आहे. तसेच मालदीव मधील बीच आणि समुद्राचं पाणी हे पाहून पर्यटक मॉडीच्या प्रेमात पडतात. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून मॉरिशस ला ओळखले जाते तेथील धबधबे, बीच पाहण्यासारखे आहेत. नेपाळ चे पशुपतिनाथचं मंदिर असो किंवा राजमहल हे पाहायला जगभरातून लोकं येतात. तसेच आफ्रिकेच्या पूर्वेकडे वसलेलं सेशेल्स आयलँड देखील मनाला भुरळ घालणारं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *