आधुनिक इतिहासाचा जनक कोण आहे?www.marathihelp.com

आधुनिक इतिहासाचा जनक कोण आहे?
'व्हॉल्टेअर' आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे म्हणता येईल.

१. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यांवर भर न देता, त्यामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा, आर्थिक व्यवस्था, शेती, व्यापार इत्यादींचाही विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.
२. व्हॉल्टेअरच्या या विचाराच्या प्रभावामुळे इतिहासाच्या मांडणीमध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार होणे गरजेचे आहे, असा विचार पुढे आला.
३. इतिहासलेखनामध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार व्हावा, हा आधुनिक विचार मांडल्याने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 5738 +22