गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो?www.marathihelp.com

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो?
गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.

नेमणूकीची तरतूद

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

निवड व नियुक्ती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तर नियुक्ती राजशासनाद्वारे केली जाते.

महाराष्ट्रात

गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.

कार्ये

पंचायत समितीची अधिकृत कागदपत्रे स्वतःच्या सहीने हस्तान्तरित करणे किंवा जतन करणे.
पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे
समितीच्या निर्णयांची अम्मलबजावणी करणे
पंचायत समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखरेख व नियन्त्रण ठेवणे.
अंदाजपत्रक तयार करणे.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 7732 +22