नोंदणी प्रमाणपत्र कोण देतो?www.marathihelp.com

कंपनी नोंदणी प्रमाणपत्र किव्हा सर्टिफिकेट ऑफ इंकॉर्पोशन म्हणजे कायदेशीर कागदपत्र/परवाना म्हणजे कंपनी किंवा महामंडळाच्या स्थापनेशी संबंधित. राज्य सरकार किंवा काही अधिकारक्षेत्रांमध्ये अशासकीय संस्था/महामंडळाद्वारे जारी केलेले कॉर्पोरेशन तयार करण्याचा हा परवाना असते.

नोंदणीचा "प्रभावी दिनांक" कोणता असेल?

जेव्हा, ज्या दिनांकापासून व्यक्‍ती नोंदणीसाठी जबाबदार असते, त्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी अर्ज केल्यास, ज्या दिनांकापासून व्यक्‍ती नोंदणीसाठी जबाबदार ठरली आहे, तो दिनांक नोंदणीचा "प्रभावी दिनांक" असेल.

जेव्हा, एखादा अर्जदार, नोंदणीसाठी जबाबदार ठरलेल्या दिनांकापासून तीस दिवसानंतर नोंदणीसाठी अर्ज सादर करतो, तेव्हा ज्या दिनांकास नोंदणीस मान्‍यता मिळते, तो दिनांक नोंदणीचा "प्रभावी दिनांक" असेल. स्वयंप्रेरणेने नोंदणी करण्याबाबत, म्हणजेच कर अधिदानाच्या सीमित सूट मर्यादेत असलेली व्यक्‍ती जेव्हा स्वच्छेने नोंदणी करते, तेव्हा नोंदणी आदेश पारित झाल्याचा दिनांक नोंदणीचा "प्रभावी दिनांक" असेल.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 6727 +22